Maharashtra Assembly Election 2024 | भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पुण्यात सर्वेक्षण तर नाशिकमध्ये गुप्त मतदान; विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरु आहे. भाजपनेही (BJP) रणनीती आखत मोर्चेबांधणी केली आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शहा (Amit Shah) यांचे दौरे वाढलेले दिसत असतानाच भाजपच्या केंद्रीय समितीचेही महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या टीमकडून पुण्यात सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DAnu3UZCvlv
त्यामध्ये एका केंद्रीय मंत्र्याने नियुक्त केलेले एक पथक पुण्यात तळ ठोकून असून भाजपच्या अति वरिष्ठ नेत्याकडून पुण्यात सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील सर्व ८ विधानसभा मतदारसंघात गोपनीय सर्वेक्षण सुरू असून पुण्यातील विद्यमान आमदार यांच्या मतदारसंघासह इतर ठिकाणी सर्वेक्षण केले जात आहे.
https://www.instagram.com/p/DAnohvxJ1Cc
या सर्वेक्षणाचा अहवाल थेट केंद्रात पाठवला जाणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे निवडणूक प्रभारी यांच्यापर्यंत हा अहवाल पोहोचवला जाणार आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या अहवालातून वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेली नावं, पक्षाच्या पातळीवर करण्यात आलेले सर्वेक्षण, इलेक्टिव मेरिट वर तिकीट जाहीर होणार आहे.
https://www.instagram.com/p/DAnk37uiObZ
तसेच नाशिक जिल्ह्यांतील विधानसभेच्या जागांसाठीही भाजपने मायक्रो प्लॅनिंग केले आहे. भाजपने नाशिकच्या प्रत्येक मतदारसंघात गुजरातच्या स्पेशल टीम सोबतच निरीक्षकांची फौज मैदानात उतरवली आहे. यामधून यंदा पहिल्यांदाच उमेदवार निवडीसाठी प्रत्येक मतदारसंघात गुप्त मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.
https://www.instagram.com/p/DAnhDmVCVWc
नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मदारसंघात तब्बल ७०० भाजप पदाधिकाऱ्यांनी उमेदवार निवडीसाठी गुप्त मतदान केल्याचे सांगण्यात येत असून भाजपच्या नव्या प्रक्रियेमुळे विद्यमान आमदारांची धाकधूक चांगलीच वाढवली आहे.
https://www.instagram.com/p/DAnUCqEpDbG
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’