Pune Crime Branch News | पत्नीला भेटायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला ! मोक्कातील गुन्हेगार एक वर्षापासून होता फरार

Arrest

पुणे : Pune Crime Branch News | सराईत गुन्हेगारावर (Criminal On Police Record) पोलिसांनी मोक्का अंतर्गत (Pune Police MCOCA Action) कारवाई केल्यापासून तो तब्बल एक वर्ष पोलिसांना चकवा देत होता. अखेर पत्नीला भेटायला आला आणि पोलिसांनी ही संधी साधत त्याला जेरबंद केले. (Abscond In MCOCA)

शाम रवी विटकर Shyam Ravi Vitkar (वय २३, रा. साठेनगर, पद्मावती रोड, आळंदी देवाची, ता. खेड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शाम विटकर याच्याविरुद्ध पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा शाम विटकर याच्यावर दाखल होता. त्या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याच्यावर गेल्या वर्षी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून तो फरार होता. त्याचा शोध पुणे व पिंपरी चिंचवडचे पोलीस घेत होते. परंतु, तो सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार किशोर बर्गे यांना गोपनीय बातमी मिळाली की, शाम विटकर हा आपल्या पत्नीला भेटायला वडारवाडीतील गोलंदाज चौक येथे येणार आहे. या माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी गोलंदाज चौकात सापळा रचून शाम विटकर याला पकडले. पुढील तपासासाठी त्याला दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (ACP Rajendra Mulik) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार (PI Vijay Kumbhar), पोलीस उपनिरीक्षक गौरव देव (PSI Gaurav Dev), पोलीस अंमलदार येडे, चेतन चव्हाण, चेतन आपटे, अमोल राऊत, किशोर बर्गे यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed