Kothrud Assembly Constituency | मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इच्छुक भाजप कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लावला; भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पाटील यांच्यावर हल्लाबोल (Video)
पुणे : Kothrud Assembly Constituency | निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करणे हा पक्षातील लोकशाहीचा भाग आहे. परंतु, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी इच्छुक कार्यकर्त्यांचा आत्मसन्मानाला धक्का लावण्याच्या दबावाच्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप करत माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी पाटील यांना थेट आव्हान दिले.
https://www.instagram.com/reel/DAqLAGBJA_n/?utm_source=ig_web_copy_link
भाजपच्या वतीने शहरातील सहा मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी निरीक्षकांच्या उपस्थितीत त्या मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. या सहाही जागांपैकी पाच जागांवर विद्यमान आमदारांनाच पसंती मिळाल्याने अन्य इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोथरूड मतदार संघातून इच्छुक असलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत या संतापाला वाट मोकळी करून देत थेट माजी प्रदेश अध्यक्ष राहिलेल्या कोथरूड चे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल केला. (Pune BJP)
बालवडकर म्हणाले, कार्यकर्ता निडर असावा. चुकीचं काही होत असेल तर ते मांडणारा असावा. पक्षाबद्दल काही मत नाही. परंतु काही व्यक्तींबद्दल तक्रार आहे. काल निरीक्षक आले होते. तेथे मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निरोप पाठवण्यात आले होते. हा वाजपेयींचा पक्ष आहे. अमोल बालवडकर आणि शाम देशपांडे यांचे नाव घेवू नये असे पदाधिकाऱ्यांना सांगितले गेले. वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार असतील तर ते घेतीलच. परंतु काही नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे.
माझ्या कोथरूड मधील नेते खूप मोठे आहेत. त्यांच्याबाबत कोणत्या वरिष्ठांकडे जायचे हा प्रश्न असल्याने माध्यमातून मांडत आहे. गिरीश बापट साहेब असते तर हा प्रकार झाला नसता.
कार्यकर्ता काम करत असतो. मी दोन महिन्यांपासून तयारी करत आहे. परंतु कालच्या प्रक्रियेत मला बहिष्कृत केले गेले. चंद्रकांत पाटील माझ्या कार्यक्रमाला येत नाहीत. दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी माझ्या कार्यक्रमाला येवू यासाठी दबाव टाकतात. इच्छुक होणे हा गुन्हा आहे ? मला भविष्याची चिंता नाही. आत्मसन्मान दुखावला जात असेल तर तो मांडला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांना देखील कळविले आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप निरोप मिळाला नाही.
आमदार पाटील यांना अहंकार आलाय ? पक्षाची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत आहे त्याचा निषेध करतो. पक्षाचा सर्वे गोपनीय होता. परंतु तो लीक केला आहे. खरा सर्वे जनतेचा आहे. मी कोथरूड मध्ये सर्वे केला आहे. ३५ हजार कुटुंबीयांना संपर्क केला आहे. त्यामध्ये बहुतांश नागरिकांनी मला पसंदी दिली आहे. निरीक्षकांनी हा सर्वे पहावा असे आवाहन देखील बालवडकर यांनी केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’