Pune Crime Branch News | दुचाकी चोरणार्या अल्पवयीन मुलाकडून वाहनचोरीचे 3 गुन्हे उघडकीस; अल्पवयीन असून चोरीची कार होता फिरवत
पुणे: Pune Crime Branch News | अल्पवयीन असूनही तो कार चोरुन ती चालवत होता. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने या अल्पवयीन मुलाला पकडून त्याच्याकडून वाहन चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले़ दुचाकी, रिक्षा आणि कार जप्त केली आहे.
वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वारजे येथील म्हाडा कॉलनीतील मोकळ्या मैदानाजवळ एक जण चोरीच्या कारसह उभा आहे. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन या मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सँन्ट्रो कार ही वारजेमधून चोरल्याचे आढळून आले. त्याच्याकडून १ दुचाकी, १ रिक्षा आणि १ कार असा १ लाख ४५ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingle) व दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (PI Nandkumar Bidwai) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe), पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख (PSI Shahid Shaikh), पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रवींद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’