Yerawada Pune Crime News | सराईत गुन्हेगारांकडून वाहन चोरीचे 2 गुन्हे उघडकीस; 2 लाख 21 हजारांचा माल हस्तगत

Yerawada Police

पुणे : Yerawada Pune Crime News | सराईत गुन्हेगारांना (Criminal On Police Record) पकडून येरवडा पोलिसांनी त्यांच्याकडून वाहन चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून २ मोपेड गाड्या व ६ मोबाईल असा २ लाख २१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. यश सागर ओंबाळे (वय २३, रा. कंजारभाट, येरवडा), ओमकार राजेश मोरे (वय २१, रा. रामनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Yerawada Police)

https://www.instagram.com/p/DAp6yVZCtj-

येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की, दोन संशयित दोन मोपेड विक्री करण्यासाठी येरवडा येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार येत असलेल्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडील गाड्यांची चौकशी केली. तेव्हा त्यातील एक चतु:श्रृंगी पोलीस ठाणे (Chaturshringi Police Station) तर एक शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या (Shikrapur Police Station) हद्दीतून चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल होते. पोलिसांनी दोन्ही मोपेड व ६ मोबाईल असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. (Arrest In Vehicle Theft)

https://www.instagram.com/p/DAp41kwi7kD

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar),
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे (ACP Pranjali Sonawane), वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke), गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहेर (PI Pallavi Mehare) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके (API Sunil Salunkhe), हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DApz4Y9Jhpe

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed