Anti Corruption Bureau (ACB) Trap News | कनिष्ठ लिपिकाने आपल्याच मुख्याध्यापकांकडे मागितली लाच ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
चंद्रपूर : Anti Corruption Bureau (ACB) Trap News | ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले, त्याच शाळेतील कनिष्ठ लिपिक आता सेवानिवृत्तीनंतर अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणीत करण्याकरीता व तसे पत्र शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागत असल्याचे समोर आले आहे. आपल्याच शाळेत मुख्याध्यापकांना लाच द्यावी लागली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खासगी व्यक्तीसह दोघांना अटक केली आहे.
https://www.instagram.com/p/DA3VDZZJdqF
कनिष्ठ लिपिक मोहम्मद अकिल इस्माईल शेख (वय ५४) खासगी व्यक्ती श्रीकृष्ण परसराम शेंडे (वय ३४, रा. वाढोणा, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
https://www.instagram.com/p/DA3Tt-tpMR_
तक्रारदार हे मौजा नागभीड येथील रहिवासी असून ते समाजसेवा विद्यालय, वाढोणा येथून मुख्याध्यापक पदावरुन २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. तक्रारदार यांचे सेवानिवृत्ती नंतर सेवाकालावधी दरम्यान जमा असलेले अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणीत करण्याकरीता व मुख्याध्यापक यांचे कव्हिरींग पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग लेखाधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी कनिष्ठ लिपिक मोहम्मद शेख याच्याशी संपर्क केला. तेव्हा शेख याने हे काम करुन देण्याकरीता १५ हजार रुपयांची लाच मागितली.
https://www.instagram.com/p/DA3OOagJN8a
जेथे उच्च पदावर काम केले़ तेथेच लाच देण्याची पाळी मुख्याध्यापकांवर आली. त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात हे काम करण्याकरीता पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये आधी स्वीकारण्याचे व काम पूर्ण झाल्यानंतर १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी मोहम्मद शेख याने दर्शविली.
https://www.instagram.com/p/DA3J_G3plE0
त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी शेख याने तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन वाढोणा येथील चौरस्ता येथील अपना टी स्टॉल अँड नास्ता पॉईंट येथे बोलविले. तेथे शेख याने तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये घेऊन त्याचे जवळ उभे असलेली खासगी व्यक्ती श्रीकृष्ण शेडे याच्याकडे दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.
https://www.instagram.com/p/DA3GEe5pWVm
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या नागपूरचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, हवालदार नरेश नन्नावरे, पोलीस अंमलदार राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, मेघा मोहुर्ले, हवालदार रवी तायडे यांनी केली.
https://www.instagram.com/p/DA20O3LpWwm
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’