Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

इंदापूर : Indapur Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या प्रचारार्थ इंदापूरमधील काटी गावात जाहीर सभा पार पडली.
यावेळी जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि दत्तात्रय भरणे (Jayant Patil On Dattatray Bharne) यांच्यावर निशाणा साधला. “आमदार दत्तात्रय भरणे हे गद्दार आहेत. त्यांना या विधानसभेला पाडा.’ असं आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील म्हणाले, येत्या २० तारखेला सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा मुहूर्त आहे. यात गद्दार भरणे यांना पाडा. भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा. दमदाटी करणारा आमदार आपल्याला नको असे म्हणत त्यांनी इंदापूरमधील नागरिकांना आवाहन केले आहे. मागील काही महिन्यांपासून इंदापूरमध्ये मलिदा गॅंग ची चर्चा आहे. त्यामुळे आता खमक्या नेतृत्वाची तालुक्याला गरज असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. (Indapur Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’