Pink Buses In Pune | पुण्यात महिलांसाठी उभारलेल्या ‘पिंक बस’ स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर; पाणी आणि ड्रेनेजअभावी बसेस विनावापर – संदीप खर्डेकर

Pink Buses In Pune | Question about 'Pink Bus' toilets set up for women in Pune; Buses are useless due to lack of water and drainage - Sandeep Khardekar

पुणे : Pink Buses In Pune | शहरातील महिलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘पिंक बस’ स्वच्छतागृहांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आवश्यक पाणी व ड्रेनेज कनेक्शन नसल्याने अनेक बसेस वापराविना उभ्या असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजी उद्यानासमोर महिलांसाठी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह बंद अवस्थेत आढळल्याने हा मुद्दा चर्चेत आला. महिलांसाठी शहरात पुरेशा आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः गणेशोत्सव, पालखी सोहळा, दिवाळी यांसारख्या मोठ्या कार्यक्रमांच्या काळात महिला नागरिक आणि महिला पोलिसांची मोठी गैरसोय होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेकडून शहरातील ११ बस ‘पे अँड यूज’ तत्त्वावर खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बसेसमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित संस्था सुमारे ९० लाख रुपये खर्च करणार आहे. प्रत्येकी पाच रुपये शुल्क आकारून या सुविधा महिलांसाठी उपलब्ध होणार आहेत.

सध्या शनिवारी वाडा परिसरातील एक बस कार्यरत असली तरी छत्रपती संभाजी उद्यान आणि कात्रज उद्यान येथील दोन बसेस पाणी व ड्रेनेज कनेक्शनअभावी बंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. इतर बसेसही पुढील काही काळात सुरू होणार असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर महिलांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित बसेसना तातडीने पाणी, ड्रेनेज आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी मूलभूत सुविधा सक्षम करणे हे पुण्यासारख्या शहराच्या सुसंस्कृत प्रतिमेसाठी आवश्यक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.त्यानंतर आता परत आलेले वॉरंट न बजावण्यासाठी त्याने अडीच लाखांची मागणी केली होती. यावेळी तक्रारदार यांचे मालक आजारी असल्याने त्यांनी तक्रारदारांना पाठविले होते. चांगला बकरा सापडला, आताही चांगला माल मिळेल, असे वाटून त्यांनी पुन्हा मागणी केली. त्याला ती गोत्यात आणायला कारणीभूत ठरली.

You may have missed