Pune Crime News | ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या तरुणीचा गळा दाबून खुन करुन रस्त्यात टाकून दिला मृतदेह; केशवनगरमधील मध्यरात्रीची घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | ब्युटी पार्लरचे काम करणार्‍या तरुणीचा गळा दाबुन तिचा खुन केला, त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी गावठाण) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री सव्वा नऊ ते गुरुवारी मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या दरम्यान केशवनगर येथील कचरा डेपोजवळील रोडवर घडला. याबाबत तिच्या लहान बहिणीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरीन पठाण हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. तिला ग्राहकाच्या जशा ऑर्डर येतील, त्याप्रमाणे ती त्यांच्या घरी जाऊन पार्लरचे काम करत असे. तशीच ती बुधवारी एका ग्राहकाकडे कामाला गेली होती. तिचा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास केशवनगर येथील कचरा डेपोच्या लगतच्या रोडवर पडलेला आढळून आला. तेथून जाणार्‍या लोकांनी येथे एक मुलगी पडली असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलिसांनी तेथे जाऊन  पाहणी केल्यावर तिच्या अंगावर झटापट केल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यामुळे प्रथमदर्शनी पोलिसांना या तरुणीला कोणत्या तरी वाहनाने धडक दिली असावी, असे वाटले. तिचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. डॉक्टरांनी तिचा मृत्यु गळा दाबल्यामुळे झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तिचा मृतदेह सापडला, त्याच्या आजूबाजूला सीसीटीव्ही नाहीत़ मुंढवा पोलीस, गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत असून पोलीस निरीक्षक सागर गोडे तपास करीत आहेत.

You may have missed