Parvati Assembly Election Results 2024 | पर्वती मतदारसंघात भाजपचे निर्विवाद वर्चस्व, सलग चौथ्यांदा माधुरी मिसाळ बनल्या आमदार

पुणे: Parvati Assembly Election Results 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपकडून माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अश्विनी कदम (Ashwini Kadam) तर अपक्ष म्ह्णून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून मिसाळ यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत २० व्या फेरीअखेर त्या ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. त्यांना १ लाख १७ हजार ८८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कदम यांना ६७ हजार ३७३ मते मिळाली.
काँग्रेस बंडखोर उमेदवार आबा बागुल यांना १० हजार ४४६ मते मिळाली. विशेष म्हणजे, यंदा एकूण तीन अश्विनी कदम मैदानात होत्या. त्यातील पहिल्या अपक्ष अश्विनी अनिल कदम आणि दुसऱ्या अपक्ष अश्विनी नितीन कदम चार आकडी मतसंख्या ही गाठता आली नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी
Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’
Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट