Devdatta Nikam News | ठरले असते जायंट किलर पण पदरी पडला निसटता पराभव ! नामसाधर्म्य आणि चिन्हातही सारखेपणाचा देवदत्त निकम यांना बसला फटका

Devdatta Nikam

पुणे : Devdatta Nikam News | आपल्याविरुद्ध उमेदवाराची मते खाण्यासाठी त्याच्या नावासारखेच अपक्ष उमेदवार उभे करण्याचा डाव महायुतीने अनेक मतदारसंघात खेळला होता. लोकसभेला त्याचा काही फायदा झाला नव्हता. परंतु, लोकसभेला सातारा येथे साधर्म्य असलेल्या चिन्हाचा फायदा छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना झाला होता. पण आंबेगावात देवदत्त निकम यांच्या विरोधात केवळ चिन्हाबरोबरच नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा केल्याने जायंट किलर ठरण्याऐवजी त्यांना अवघ्या १५२३ मतांनी पराभव स्वीकारण्याची पाळी आली.

आंबेगाव मतदारसंघातून (Ambegaon Assembly Election 2024) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना दरवेळी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले जात होते. यंदा मात्र त्यांचा अटीतटीचा सामना करावा लागला. वळसे पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) देवदत्त निकम उभे होते. त्यांच्याविरोधात देवदत्त शिवाजीराव निकम यांना उभे करण्यात आले. त्याचवेळी त्यांना पिपाणी वाजविणारा माणूस या निकम यांच्या चिन्हासारखेच टॅम्पेट हे चिन्ह देण्यात आले.

दिलीप वळसे पाटील यांना १०६८८८ मते मिळाली तर देवदत्त निकम यांना १०५३६५ मते मिळाली.
यापूर्वी हजारो मतांची आघाडी घेणार्‍या वळसे पाटील यांचा अवघ्या १५२३ मतांनी विजय झाला.
दुसरा देवदत्त निकम यांना तिसर्‍या क्रमांकाची २९६५ मते मिळाली आहे. इतर कोणत्याही अपक्षांना दीड हजाराच्या खालीच मते मिळाली आहेत. हाता तोंडाशी आलेल्या विजयाचे केवळ नामसाधर्म्य आणि चिन्हातही सारखेपणा यामुळे रुपांतर पराभवात झाल्याचे शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाहण्याची वेळ आली. (Devdatta Nikam News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed