Hadapsar Pune Crime News | लाडकी बहिणीच्या नावाने वृद्ध महिलेचे दागिने हातचलाखीने केले लंपास
पुणे : Hadapsar Pune Crime News | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले़. त्यानंतर महायुतीने बहिणीच्या नावावर दरमहा १५०० रुपये देणारी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) लोकप्रिय झाली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेत भरभरुन मते मिळाली. याच लाडकी बहिणीच्या नावाने आता महिलांची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहिणीचे पैसे देत असल्याचे सांगून एका चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र व अंगठी असा ८० हजार रुपयांचा ऐवज हातचलाखीने काढून घेतला आहे. (Hadapsar Pune Crime News)
याबाबत हडपसर येथील एका ७० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना हडपसरमधील कर्मवारी भाऊराव पाटील १५ नंबर चौकात २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गुरुवारी सकाळी ११ वाजता स्वस्त धान्य दुकानाचे कुपन घेऊन घरी परत चालल्या होत्या. यावेळी पेट्रोल पंपाजवळ एक जण त्यांना भेटला व त्याने सांगितले की, चला मावशी येथे एक साहेब लाडकी बहिणीचे पैसे वाटप करीत आहेत, असे बोलून तो फिर्यादी महिलेला घेऊन भाऊराव पाटील १५ नंबर चौकात घेऊन आला. तेथे फिर्यादी यांना तो म्हणाला. या ठिकाणी बसा येथे ५ हजार रुपये वाटत आहे,
असे बोलून तो निघून गेला. बराच वेळ वाट पाहून त्या घरी निघून आल्या.
त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र व अंगठी दिसून आली नाही. बोलण्यात गुंतवून चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar News | सत्तास्थापनेच्या दिरंगाईवरून शरद पवारांची टीका; म्हणाले – ‘…
हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय’
PMC Property Tax | समाविष्ट गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीला स्थगिती ! मात्र,
जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी एक डिसेंबरपासून बँड पथक
Sinhagad Road Pune Crime News | पुणे: इस्टेट एजंटचा निर्घुण खुन करणाऱ्या चौघांच्या
हवेली पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Video)
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी
Rohidas Gavde-Varsha Patole | सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे
यांचे योगदान प्रेरणादायी – उपसंचालक वर्षा पाटोळे