Pankaja Munde Meets CM Devendra Fadnavis | पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; मराठवाड्यासाठी केल्या प्रमुख मागण्या
ऑनलाइन टीम – Pankaja Munde Meets CM Devendra Fadnavis | भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मराठवाड्यातील दुष्काळ, तेथून होणारे स्थलांतर यावर चर्चा केली. याबाबतची माहिती मुंडे यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करत दिली आहे.
पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या भेटीत मराठवाड्याच्या मुद्यांवर, विशेषत: दुष्काळ निर्मूलन आणि काही भागातील बेरोजगारी सोडवण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे.
स्थलांतरित कामगारांची समस्या
पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या मागास भाग आणि बीडमधील स्थलांतरित कामगारांच्या समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून विशेष लक्ष देण्याची मागणी केली. यासंदर्भातील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
मराठवाड्याला दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता
दरम्यान, पुढच्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे.
यामध्ये मराठवाड्याला भाजपकडून दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे यांच नाव आघाडीवर आहे.
त्यामुळे त्यांना कोणतं खातं मिळणार याची चर्चा सुरू आहे. (Pankaja Munde Meets CM Devendra Fadnavis)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण
Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला