Kamla Nehru Hospital | पुण्यात जीबीएस आजारावर होणार मोफत उपचार; रुग्णांसाठी मोठा दिलासा

Kamla nehru hospital

पुणे : Kamla Nehru Hospital | पुण्यात गुईलेन बॅरो सिंड्रोम Guillain-Barre Syndrome (GBS) च्या आजाराच्या रूग्णांची संख्या ही सातत्याने वाढताना दिसत आहे. यावर जिल्हाधिकारी आणि काही अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री अजित पवार यांनी अगोदरच बैठक घेतली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे. दरम्यान आता जीबीएस या आजारावर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. अगोदर फक्त खासगी रूग्णालयात हे उपचार सुरू होते.

पुण्यात जीबीएसचे ७४ रुग्ण आहेत. त्यापैकी १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर ५ रुग्णांना आज डिस्चार्ज होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जीबीएसच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. ५० बेड तर १५ आयसीयू कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. जीबीएस विरोधात लढण्यास प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.

ज्या खाजगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ या रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णावर सध्या उपचार सुरू आहे. तिथे आता महापालिकेचे अधिकारी असणार आहेत.

खासगी रुग्णालय रुग्णाकडून किती बिल घेतात, यावर महापालिकेचे अधिकारी हे लक्ष ठेवणार आहेत.
पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत.
त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे.
खासगी रुग्णालय रुग्णांकडून ३ ते ५ लाखांपर्यंत उपचारासाठी पैसे घेत असल्याचेही सांगितले जात आहे.
यामुळेच पालिकेचे अधिकारी आता खासगी रुग्णालयात उपस्थित असणार आहेत.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचाराची रक्कम वाढविण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed