Pune Crime News | किराणा दुकानातून गुटख्याची विक्री; महात्मा फुले वाड्याजवळ खडक पोलिसांची कारवाई

Pune Crime News | Laxminagar Police arrest two people involved in Gutkha smuggling, seize Gutkha worth 20 lakhs

पुणे : Pune Crime News | गुटख्याची सवय ही अंमली पदार्थाच्या व्यसनाची पहिली पायरी समजली जाते. अंमली पदार्थावर आळा बसविण्यासाठी पोलीस दलाकडून मोठी मोहिम हाती घेतली जात असताना शहरात गुटखा मात्र राजरोजपणे सर्वत्र मिळतो. पान टपरीवर मिळणारा गुटखा आता किराणा मालाच्या दुकानातही ठेवलेला दिसू लागला आहे. महात्मा फुल वाड्याजवळील एका किराणा दुकानातून खडक पोलिसांनी ७१०६ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. (Khadak Police Station)

याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रम विजय ऐमूल (वय ४२, रा़ गंजपेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना ऐमूल यांच्या महात्मा फुले वाड्याजवळील विजय प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात गुटखा विकला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. दुकानात ७१०६ रुपयांच्या गुटख्याच्या वेगवेगळ्या आकारातील पुड्या मिळून आल्या. पोलिसांनी हा माल जप्त केला असून पोलीस हवालदार तांबोळी तपास करीत आहेत. (Pune Crime News)

You may have missed