Crime News | महाराष्ट्रातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली

Crime News

सातारा : Crime News | साताऱ्यातील दोन तरुणांनी घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. या दोघांनी थायलंडमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोघे जण थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. थायलंड येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव नंबर सहामधील रीन बीचवर या दोघांनी जर्मन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. संबंधित पीडित तरुणीने कोह फांगन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकड़ून सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांची रवानगी सध्या थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली असून, या घटनेबाबत आणखी माहिती समोर आली नाही.

You may have missed