Gold Silver Price Today | सोने 450 रुपयांनी महागले, चांदी एक लाख पार; गुढीपाडव्याला खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमधील दर

Gold

पुणे : Gold Silver Price Today | गुढीपाडवा अवघ्या दोन दिवसांवर आला असल्याने सोने खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी आहे. ग्राहकांकडून वाढती मागणी लक्षात घेता, सोने आणि चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. गुरुवारी (27 मार्च) सोन्याचा दर 450 रुपयांनी वाढला असून, चांदी 380 रुपयांनी महागली आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दर जाणून घ्या.

बुलियन मार्केटनुसार (Bullion Market), गुरुवारी, आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किमत 81,171 रुपये आहे, तर २४ कॅरेटसाठी 88,550 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीची किमत 1001 रुपये आहे, म्हणजेच चांदी 1,00,010 रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. गेल्या काही दिवसातील हे सर्वाधिक आकडे आहेत. सोन्या-चांदीचे वाढते दर पाहून ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Gold Silver Price Today)

तुमच्या शहरातील सोन्याचा दर काय?

मुंबई :

22 कॅरेट सोन्याची किमत (प्रति 10 ग्रॅम) – 80,914 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्रॅम) – 88,270 रुपये

पुणे :

22 कॅरेट सोन्याची किमत (प्रति 10 ग्रॅम) – 80,493 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्रॅम) – 87,810 रुपये

नागपूर :

22 कॅरेट सोन्याची किमत (प्रति 10 ग्रॅम) – 80,493 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्रॅम) – 87,810 रुपये

नाशिक :

22 कॅरेट सोन्याची किमत (प्रति 10 ग्रॅम) – 80,493 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्रॅम) – 87,810 रुपये

You may have missed