Kothrud Police News | विना नंबरप्लेटची मोटारसायकल घेऊन फिरणार्या चोरट्यांकडून वाहनचोरीचे 3 गुन्हे उघडकीस; कोथरुड पोलिसांची कामगिरी

पुणे : Kothrud Police News | विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरत असलेल्या दोघांना कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. (Pune Crime News)
आकाश सुरेश वाघिरे (वय ३१, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ, कोकांडे वस्ती, शिवाजीनगर) आणि आदित्य भारत जाधव (वय २१, रा. मनोहर क्लासिक बिल्डिंग, चंदननगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Vehicle Theft Detection)
कोथरुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत असताना २३ मार्च रोजी शास्त्रीनगर पोलीस चौकीचे चौकी अंमलदार योगेश सुळ यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मेघसृष्टी गोपनाथ नगर येथे दोघे जण विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरत आहेत़ या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोघांना पकडले. त्यांच्याकडील स्कुटरबाबत पोलीसी भाषेत चौकशी केल्यावर त्यांनी भारती विद्यापीठ येथील बालाजीनगर येथून चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करुन अधिक चौकशी केल्यावर कोथरुड, लोणी काळभोर आणि भारती विद्यापीठ येथील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ८४ हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, बसवराज माळी, पोलीस अंमलदार योगेश सुळ, हनुमंत माळी यांनी केली आहे.