Buldhana BAMS Students Drown | दुर्दैवी! पोहण्यासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बुलढाणा ः Buldhana BAMS Students Drown | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बीएएमएसच्या दोन विद्यार्थ्यांचा चिखलीतील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी (१० एप्रिल) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विवेक अरुण वायले (वय २२, रा. पाथर्डी (अकोला) आणि सूरज सुनील पानखडे (वय २२, रा. गेवराई (बीड) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही चिखली येथील सुनील रामसिंह चुनावाले आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होते. चिखलीतील एका जलतरण तलावात विवेक आणि सूरज हे अन्य चार मित्रांसोबत सायंकाळी पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबत माहिती समोर आली नाही. चिखली पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.