Skip to content
  • Marathi
  • Hindi
  • English
Puneri Awaz Marathi

Puneri Awaz Marathi

Elevate Your Experience

Primary Menu Puneri Awaz Marathi

Puneri Awaz Marathi

  • Home
  • Article
  • Manikrao Kokate | ‘मी एक रुपयाचीही रमी खेळलेली नाही’; राजीनाम्याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले…
  • Article

Manikrao Kokate | ‘मी एक रुपयाचीही रमी खेळलेली नाही’; राजीनाम्याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले…

Pune News Desk July 22, 2025
Manikrao Kokate

मुंबई ः पोलीसनामा ऑनलाईन – Manikrao Kokate | विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बरीच चर्चा होती. मात्र, ही चर्चा निष्प्रभ ठरली आहे. कारण माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी (२२ जुलै) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी खुलासा केला आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहिती नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहिती नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे.

पुढे ते म्हणाले की, माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा

या वेळी माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी या नव्या योजनेचे लाँचिंग करत असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र, त्याचा जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. यानंतर कोकाटे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. या वेळी त्यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.

Total
0
Shares
Share 0
Tweet 0
Pin it 0
Share 0

Post navigation

Previous: Pune Rain Update | पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत मुसळधार पाऊस, आज पुन्हा ऑरेंज अलर्ट, आजचा हवामान अंदाज काय?
Next: Pune PMC News | महापालिका शाळांतील ई लर्निंग प्रकल्प तीन वर्षांपासून ठप्प ! प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये प्रकल्प सुरू करण्याबाबत उदासीनता

More Stories

Pune Crime News | Case registered against a young man for sexually assaulting and deceiving a young woman under the pretext of marriage.
  • Article

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन फसवणुक करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime News
  • Article

Pune Crime News | LIC च्या नावाने डेली कलेक्शनच्या नावाखाली छोट्या व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलिसांनी केली अटक

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime News | Security guard injures auto-rickshaw driver by hitting him on the head with
  • Article

Pune Crime News | भाडे मागितल्याने सुरक्षारक्षकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

Pune News Desk June 20, 2026

Featured Posts

  • Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन फसवणुक करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल
  • Pune Crime News | LIC च्या नावाने डेली कलेक्शनच्या नावाखाली छोट्या व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलिसांनी केली अटक
  • Pune Crime News | भाडे मागितल्याने सुरक्षारक्षकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी
  • Pune Crime News | आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; वारजे मधील आदित्य गार्डन सिटीमधील घटनेत ठेकेदारावर गुन्हा दाखल
  • Pune Crime Court News | पोस्को प्रकरणातील चार आरोपींना जामीन मंजूर

You may have missed

Pune Crime News | Case registered against a young man for sexually assaulting and deceiving a young woman under the pretext of marriage.
  • Article

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन फसवणुक करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime News
  • Article

Pune Crime News | LIC च्या नावाने डेली कलेक्शनच्या नावाखाली छोट्या व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलिसांनी केली अटक

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime News | Security guard injures auto-rickshaw driver by hitting him on the head with
  • Article

Pune Crime News | भाडे मागितल्याने सुरक्षारक्षकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

Pune News Desk June 20, 2026
Crime
  • Article

Pune Crime News | आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; वारजे मधील आदित्य गार्डन सिटीमधील घटनेत ठेकेदारावर गुन्हा दाखल

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime Court News
  • Article

Pune Crime Court News | पोस्को प्रकरणातील चार आरोपींना जामीन मंजूर

Pune News Desk June 20, 2026
Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.