Skip to content
  • Marathi
  • Hindi
  • English
Puneri Awaz Marathi

Puneri Awaz Marathi

Elevate Your Experience

Primary Menu Puneri Awaz Marathi

Puneri Awaz Marathi

  • Home
  • Article
  • Pune Crime News | मेडिकल दुकानादारांना 10 कोटींचा गंडा घालणार्‍या सोनाली गिरीगोसावी, जयेश जैनवर 4 गुन्हे दाखल
  • Article

Pune Crime News | मेडिकल दुकानादारांना 10 कोटींचा गंडा घालणार्‍या सोनाली गिरीगोसावी, जयेश जैनवर 4 गुन्हे दाखल

Pune News Desk November 5, 2025
fraud

पुणे : होलसेल औषध विक्रेत्यांकडून उधारीवर माल घेऊन त्यांना पोस्ट डेड चेक देऊन १० कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी Sonali Laxman Girigosavi (वय ४२, रा. मोहम्मदवाडी) जयेश वसंत जैन Jayesh Vasant Jain (वय ४१, रा. गुलटेकडी) अशी या दोघांची नावे आहेत. गेल्या दोन दिवसात त्यांच्यावर ६ कोटी १९ लाख रुपयांची फसवणुक केल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. जून मध्ये निलेश सोनिगरा यांची या दोघांनी ४ कोटी ४० लाख रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाल करुन या आरोपींवर कारवाई न केल्याने त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी होऊन त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

याबाबत सुधीर चिंतामण टेंबर (रा. विश्वनाथ अपार्टमेंट, शुक्रवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोनाली गिरीगोसावी व जयेश जैन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२३ ते मे २०२५ दरम्यान घडला. त्यांच्याकडून या दोघांनी उधारीवर औषधे खरेदी करुन त्यांचे पैसे न देता ३ कोटी ७ लाख ९६ हजार ८२३ रुपयांची फसवणुक केली आहे.

मुकेश नारायणदास खाटेर (वय ५०, रा. माकेटयार्ड) यांच्या निलु अँड कंपनी या शुक्रवार पेठेतील दुकानातून १ कोटी ३७ लाख ८२ हजार ४७८ रुपयांची औषधे खरेदी करुन फसवणुक केली आहे.

अमोल लक्ष्मीकांत क्षीरसागर (वय ४८, रा. विष्णु विहार, बिबवेवाडी) यांच्या सदाशिव पेठेतील धनश्री एजन्सीज मधून १ कोटी ७३ लाख ६३ हजार ४६ रुपयांची औषधे खरेदी करुन फसवणुक केली आहे. या सर्व घाऊक औषध वितरकाकडून त्यांनी २०२३ पासून मे २०२५ पर्यंत औषधे खरेदी केली.
सोनाली गिरीगोसावी हिने सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ येथील अनेक दुकानदारांकडून औषधे खरेदी करत होती. उधारीने माल द्यावा, यासाठी तिने एकमेकांच्या दुकानदारांचा संदर्भ देत असे. या दुकानदारांनी तिला माल पुरविणार्‍या व्यापार्‍यांकडे चौकशी केल्यावर सोनाली गिरीगोसावी ही माल दिल्यानंतर ३ ते ४ दिवसात चेकद्वारे बिलाचे पेमेंट होत आहे, अशी माहिती मिळत. त्यामुळे तेही तिला उधार माल देऊ लागले. ती वानवडी येथील शिवरकर गार्डनसमोर ओम साईनाथ मेडिकल असल्याचे सांगून त्या नावाने व्यवहार करत असे. सुरुवातीला काही बिलांचे पेमेंट केल्यानंतर ती मालाचे रक्कमेवर ४५ दिवसांची उधारीची मुदत व ४ टक्के डिस्काऊंट मागत असे. मोठी ऑर्डर असल्याने हे व्यापारी माल देत असत. काही काळाने सोनाली गिरी गोसावी आपण हा माल जयेश जेन याला पुरवत असून तो पुढे एक्सपोर्ट व शासकीय रुग्णालय यांना पुरवितो, असे सांगत. त्याच्या मागणीप्रमाणे माल देत जा असे सांगत. जयेश जैन हा माल घेऊन जाऊन मॅडमला त्याचे पेमेंट करेन. तुमचे पेमेंट मॅडम करतील, असे सांगत. मे २०२५ पर्यंत त्यांनी कोट्यावधींचा माल घेतला. त्यानंतर सोनाली गिरीगोसावी हिने वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करु लागली. तिने दिलेले पोस्ट डेटेड चेक बँकेत भरल्यावर ते शिल्लक नसल्याने परत येऊ लागले. याबाबत निलेश सोनीगिरा यांची जुन मध्ये ४ कोटी ४० लाख रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलिसांनी दाखल करुन घेतला होता़. त्यानंतर आता आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Total
0
Shares
Share 0
Tweet 0
Pin it 0
Share 0

Post navigation

Previous: Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ! आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पती, सासु, दीर, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Next: Pune Crime News | MPDA ची कारवाई केल्यानंतर 4 वर्षे फरार असलेल्या गज्या मारणेचा राईट हँड सुनिल बनसोडे याला अटक

More Stories

Pune Crime News | Case registered against a young man for sexually assaulting and deceiving a young woman under the pretext of marriage.
  • Article

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन फसवणुक करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime News
  • Article

Pune Crime News | LIC च्या नावाने डेली कलेक्शनच्या नावाखाली छोट्या व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलिसांनी केली अटक

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime News | Security guard injures auto-rickshaw driver by hitting him on the head with
  • Article

Pune Crime News | भाडे मागितल्याने सुरक्षारक्षकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

Pune News Desk June 20, 2026

Featured Posts

  • Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन फसवणुक करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल
  • Pune Crime News | LIC च्या नावाने डेली कलेक्शनच्या नावाखाली छोट्या व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलिसांनी केली अटक
  • Pune Crime News | भाडे मागितल्याने सुरक्षारक्षकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी
  • Pune Crime News | आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; वारजे मधील आदित्य गार्डन सिटीमधील घटनेत ठेकेदारावर गुन्हा दाखल
  • Pune Crime Court News | पोस्को प्रकरणातील चार आरोपींना जामीन मंजूर

You may have missed

Pune Crime News | Case registered against a young man for sexually assaulting and deceiving a young woman under the pretext of marriage.
  • Article

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन फसवणुक करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime News
  • Article

Pune Crime News | LIC च्या नावाने डेली कलेक्शनच्या नावाखाली छोट्या व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याला विमानतळ पोलिसांनी केली अटक

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime News | Security guard injures auto-rickshaw driver by hitting him on the head with
  • Article

Pune Crime News | भाडे मागितल्याने सुरक्षारक्षकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

Pune News Desk June 20, 2026
Crime
  • Article

Pune Crime News | आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; वारजे मधील आदित्य गार्डन सिटीमधील घटनेत ठेकेदारावर गुन्हा दाखल

Pune News Desk June 20, 2026
Pune Crime Court News
  • Article

Pune Crime Court News | पोस्को प्रकरणातील चार आरोपींना जामीन मंजूर

Pune News Desk June 20, 2026
Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.