Pune Crime News | खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड करणार्‍या अल्पवयीन मुलाकडून पिस्टल, जिवंत काडतुस जप्त; दहशत माजविण्यासाठी बाळगले होते पिस्टल

Pune Crime News | Attempted murder, pistol, live cartridges seized from minor who vandalized vehicles; Pistol was kept to spread terror

पुणे : Pune Crime News |  खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या अल्पवयीन मुलाकडून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. दहशत माजविण्यासाठी त्याने हे पिस्टल बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेतील युनिट २ चे पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. तळजाई वसाहत परिसरात एक अल्पवयीन थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे ४० हजार ४०० रुपयांचे देशी बनावटीचे पिस्टल व एक काडतुस आढळून आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दहशत माजविण्यासाठी पिस्टल बाळगल्याचे सांगितले.

सहकारनगर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाणे व पुसेगाव पोलीस ठाणे (सातारा) येथे खुनाचा प्रयत्न आणि पर्वती पोलीस ठाणे येथे वाहन तोडफोडीचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी अपर  पोलीस आयुक्त पंकज देशमुख,  पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ,  पोलीस अंमलदार संजय जाधव, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, उज्वल मोकाशी, योेगेश मांढरे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, शंकर नेवसे, विजय कुमार पवार, संतोष टकले, ओमकार कुंभार, नागनाथ राख, संदिप शिर्के, विशाल दळवी, अजीम शेख, सद्दाम तांबोळी यांनी केली आहे.

You may have missed