Pune Police News | पुणे शहर पोलीस दलात आता 7 परिमंडळ, दोन नव्या परिमंडळाला मंजुरी; 4 सहायक पोलीस आयुक्त वाढणार

Pune Police News

पुणे : Pune Police News | शहर पोलीस दलामार्फत शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या ‘तरंग’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहर पोलीस दलात ५ नवीन पोलीस ठाणी आणि २ नवीन परिमंडळांची घोषणा केली होती. त्याची पुर्तता करुन नवीन २ परिमंडळाला मंजुरी देण्यात आली आहे.

पुणे शहर पोलीस दलातील सध्याच्या परिमंडळांची पूर्नरचना करुन २ नवीन परिमंडळ निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या नवीन परिमंडळासाठी २ पोलीस उपायुक्त पदासाठी २ कोटी ३६ लाख ४८ हजार रुपयांच्या आवर्ती व ९० लाख ३८ हजार रुपयांच्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. सध्या पुणे पोलीस दलात २७ सहायक पोलीस आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यात आणखी ४ पदे वाढणार आहेत.

दोन अपर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत पश्चिम प्रादेशिक विभागात ३ पोलीस आयुक्त आणि ६ सहायक पोलीस आयुक्त तसेच २० पोलीस ठाणी असणार आहेत.

पूर्व प्रादेशिक विभागात ४ पोलीस आयुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त आणि २४ पोलीस ठाणी असणार आहेत.

परिमंडळ १ अंतर्गत – फरासखाना सहायक पोलीस आयुक्त – खडक, फरासखाना, समर्थ पोलीस ठाणे,

विश्रामबाग सहायक पोलीस आयुक्त- विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कऩ

परिमंडळ २ अंतर्गत – स्वारगेट सहायक पोलीस आयुक्त – स्वारगेट, सहकारनगर, पर्वती,

भारती विद्यापीठ सहायक पोलीस आयुक्त – बिबवेवाडी, मार्केटयार्ड, भारती विद्यापीठ, आंबेगाव पोलीस ठाणे

परिमंडळ ३ अंतर्गत – कोथरुड सहायक पोलीस आयुक्त – कोथरुड, वारजे माळवाडी, अंलकार पोलीस ठाणे

सिंहगड रोड सहायक पोलीस आयुक्त – उत्तमनगर, नांदेडसिटी, सिंहगड रोड, नर्‍हे पोलीस ठाणे

पूर्व प्रादेशिक विभागामध्ये परिमंडळ ४ अंतर्गत – खडकी सहायक पोलीस आयुक्त – बाणेर, चतु:श्रृंगी आणि खडकी पोलीस ठाणे

येरवडा सहायक पोलीस आयुक्त – विश्रांतवाडी, येरवडा व लक्ष्मीनगर पोलीस ठाणे

परिमंडळ ५ अंतर्गत – वानवडी सहायक पोलीस आयुक्त – येवलेवाडी, कोंढवा, वानवडी पोलीस ठाणे.

लष्कर सहायक पोलीस आयुक्त – बंडगार्डन, कोरेगाव पार्क, लष्कर पोलीस ठाणे

परिमंडळ ६ अंतर्गत – हडपसर सहायक पोलीस आयुक्त – मुंढवा, हडपसर, काळेपडळ पोलीस ठाणे

लोणीकाळभोर सहायक पोलीस आयुक्त – फुरसुंगी, मांजरी आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे

परिमंडळ ७ अंतर्गत – लोणीकंद सहायक पोलीस आयुक्त – लोणीकंद, वाघोली, लोहगाव पोलीस ठाणे.

खराडी सहायक पोलीस आयुक्त – विमानतळ, खराडी, चंदननगर पोलीस ठाणे

अशी नवी रचना असणार आहे.

या २ नवीन पोलीस उपायुक्तालयामध्ये प्रत्येकी १ पोलीस उपायुक्त, २ सहायक पोलीस आयुक्त, १ सहायक पोलीस निरीक्षक, १ प्रमुख लिपिक, १ वरिष्ठ श्रेणी लिपिक, २ कनिष्ठ श्रेणी लिपिक, १कार्यालयीन शिपाई अशी प्रत्येकी ९ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे़.

You may have missed