Pune Crime News | रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पर्वती पोलिसांनी जप्त केले देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे

Pune Crime News | Parvati police seize country-made pistol and 2 live cartridges from criminal on record

पुणे : Pune Crime News |  खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जेरबंद करुन पर्वती पोलिसांनी त्याच्याकडून पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

भिमराव नरसप्पा मानपाडे Bhimrao Narasappa Manpade (वय २४, रा. साईनगर, गुलाबनगर, धनकवडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. भिमराव मानपाडे याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी मानपाडे याला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने १४ हजार ५०० रुपये काढून घेऊन लुटले होते. गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये हा प्रकार घडला होता. त्याची भिमराव मानपाडे याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

याबाबत पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पर्वती पोलीस ठाण्याचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करत होते. १३ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख, स्वप्निल घुगे यांना बातमी मिळाली की, बागुल उद्यानाजवळ एक जण हुडी घालून थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. तो कोणाची तरी वाट पहात आहे. या बातमीनुसार पोलीस पथक तेथे पोहचले. पोलिसांनी त्याला पकडून त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे असा ३७ हजार रुपयांचा माल मिळाला. पर्वती पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, स्वप्निल घुगे, सूर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे, समीर जोशी यांनी केली आहे.

You may have missed