ACP-DCP Transfers In Pune | नव्या 2 परिमंडळ निर्मितीमुळे पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या; सहायक पोलीस आयुक्तांच्याही अंतर्गत बदल्या

Pune Police News

पुणे : ACP-DCP Transfers In Pune |  शहर पोलीस दलात २ नवीन परिमंडळ निर्माण करण्यात आले. जुन्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन नवीन परिमंडळ स्थापन करण्यात आले  आहे. त्यानुसार नवीन पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्य राखीव पोलीस दल, गट ७ दौंडचे समादेशक चिलुमुला रजनीकांत यांची परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजलक्ष्मी शिवणकर यांची पोलीस मुख्यालयातून परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची परिमंडळ ५ येथून परिमंडळ ६ च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

परिमंडळ ४ चे सोमय मुंडे यांची परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

पुण्यात नव्याने आलेले सागर कवडे यांची पोलीस उपायुक्त मुख्यालय येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

याचबरोबर परिमंडळ ६ व ७ साठी प्रत्येकी २ सहायक पोलीस आयुक्तपद निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे.

सहायक पोलीस आयुक्त (सध्याचे ठिकाण), बदलीचे ठिकाण असे :

अतुलकुमार नवगिरे (विशेष शाखा १), हडपसर विभाग
नुतन पवार (विशेष शाखा २) लोणीकंद विभाग
प्रांजली सोनावणे (येरवडा विभाग) खराडी विभाग
राहुल आवारे (स्वारगेट विभाग) भारती विद्यापीठ विभाग
सुनिल जैतापूरकर (अभियान) येरवडा विभाग
धन्यकुमार गोडसे (आस्थापना) स्वारगेट विभाग
अनुराधा उदमले (हडपसर विभाग) लोणी काळभोर विभाग
शैलेश संखे (पदोन्नती) गुन्हे शाखा, सहायक पोलीस आयुक्त

You may have missed