Pune Crime News | क्लासला घरी बोलावून डोळ्याला पट्टी बांधून फुड टेस्टिंगचा खेळ खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग
पुणे : Pune Crime News | शिक्षिका पत्नी घरी नसताना तिच्या पतीने लहान मुलीला व तिच्या मैत्रिणीला क्लास बोलावले. मैत्रिणीला आजीकडे पाठवून डोळ्याला पट्टी बांधून फुड टेस्टिंगचा खेळ खेळण्याचा बहाणा करुन शिक्षिकाच्या पतीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत या मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आलिम शिकलगार (वय ४०, रा. शेजवळ पार्क, बोराटे वस्ती, चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आरोपीच्या घरी १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिम शिकलगार याची पत्नी लहान मुलींचा क्लास घेत होती. ती शिक्षिका घरी नसताना तिच्या पतीने फिर्यादी यांची ७ वर्षाची मुलगी व तिच्या मैत्रिणीला क्लाससाठी बोलावून घेतले. या मुली क्लासला आल्यानंतर त्याने तिच्या मैत्रिणींना त्यांच्या आजीकडे पाठविले. त्यानंतर पिडित मुलीला स्वत:चे घरी थांबवुन तिच्या डोळ्यावर पिंक कलरची ओढणी बांधली. फुड टेस्टिंगची गेम खेळण्याचा बहाणा करुन तिला अॅपल, चॉकलेट सिरप, पेरु आणि कॅटबरी टेस्टसाठी दिली. त्यानंतर तिच्या अंगावर असलेली मखनी काढायला सांगितली. तिने नकार दिल्यावर तिच्या अंगावर हात फिरवत तिच्या बालमनास लज्जा उत्पन्न केली. या घटनेने घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. दोन दिवसाने तिने आईला या घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत तपास करीत आहेत.
