Nitin Nabin | नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; उद्योगपती प्रफुल कोठारी यांच्याकडून अभिनंदन

Nitin Nabin | Nitin Navin elected as BJP national president; Congratulations from industrialist Praful Kothari

नवी दिल्ली : Nitin Nabin | भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड झाल्याबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्योगपती तसेच भाजपचे सक्रिय सदस्य प्रफुल कोठारी (Praful Kothari) यांनीही आपल्या जिवलग मित्राच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त करत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रफुल कोठारी म्हणाले, “नितीन नबीन हे अत्यंत कर्तव्यदक्ष, संघटनात्मक बांधणी मजबूत करणारे आणि कार्यकर्त्यांशी सतत संवाद ठेवणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप अधिक बळकट होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. मित्र म्हणून मला अभिमान वाटतो आणि भाजपच्या एका सक्रिय सदस्य म्हणून ही निवड पक्षासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल.”

ते पुढे म्हणाले की, “नितीन नबीन यांनी आतापर्यंत पक्षात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या माध्यमातून ते पक्षाला नवे दिशादर्शन देतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला अधिक बळ देतील.”

प्रफुल कोठारी हे भाजपच्या विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून पक्षवाढीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. आपल्या मित्राच्या या महत्त्वाच्या पदावर निवडीमुळे भाजप कुटुंबात नवचैतन्य निर्माण झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नितीन नबीन यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात पक्ष अधिक मजबुतीने देशसेवेसाठी पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

You may have missed