Pune Crime News | पैंजण विकत घेण्यासाठी येऊन नजर चुकवुन 7 पैंजण चोरुन नेणार्‍या टोळीला लोहगाव पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Lohgaon police caught a gang that came to buy silver anklets but secretly stole 7 silver anklets

पुणे : Pune Crime News | चांदीची मोड देऊन पैंजण विकत घेण्यासाठी आलेल्या महिला व पुरुषांनी पैंजणाचा बॉक्स खाली पाडला. त्यातील पैंजण उचलून देताना सराफाची नजर चुकवून ७ पैंजण चोरुन नेले. लोहगाव पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले आहे.

कल्पना अंकुश कांबळे Kalpana Ankush Kamble (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर), पांडुरंग राम गायकवाड Pandurang Ram Gaikwad (वय ४२, रा. रुपीनगर, निगडी), दिक्षा वसंत शेलार Diksha Vasant Shelar (वय ३२, रा. रुपीनगर, निगडी), सुमन बाबासाहेब कोरके Suman Babasaheb Korke (वय ६२, रा. गोसावी वस्ती, हडपसर), उत्तम बाबासाहेब कोरके Uttam Babasaheb Korke (वय ४५, रा. मारळगाव, शहाडगाव (कल्याण, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीतील २ महिला व एक पुरुष हे दुकानात गेले. त्याचवेळी एक महिला व एक पुरुष हे कारमध्ये बसुन होते. पोलिसांनी केलेल्या तपासात हे उघडकीस आले आहे.

याबाबत पंकज चंद्रकांत तामखडे (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) यांनी लोहगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. लोहगाव वाघोली रोडवर त्यांचे श्री विश्वनाथ ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. ते दुकानात असताना ९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता दुकानात २ महिला व एक पुरुष आले. त्यांनी चांदीची मोड दाखवुन त्याचे किती पैसे होतील, असे विचारले. तेव्हा फिर्यादी यांनी जुन्या मोडीचे ६ हजार रुपये होतील, असे सांगितले. ते म्हणाले की, आम्हाला पायातील पैंजण घ्यायचे आहे. त्यांनी दुकानाचे काऊंटरमधील डब्बा काढून त्यातील ८९ चांदीचे पैंजणाचे जोड त्यांना दाखविले. तेव्हा ते पैंजण पहात असताना त्यातील एका महिलेने पैंजणाचा डब्बा खाली पाडला. त्यानंतर ते डब्ब्यामधील पैंजण परत डब्ब्यामध्ये भरले. त्यानंतर त्यांनी आम्ही कॅश पैसे घेऊन येतो, आमच्या जवळ सध्या पैसे नाहीत, असे बोलून ते दुकानातून निघून गेले. त्यानंतर सायंकाळी डब्यामधील पैंजण मोजून ठेवत असताना त्यांच्या लक्षात आले की, डब्यामधील ८९ पैंजणाचे जोड पैकी ७ पैंजण जोड मिळून आले नाही. त्यांनी दुकानामधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले पण त्यात काही मिळून आले नाही़ ४२० ग्रॅम वजनाचे ७० हजार रुपयांचे पैंजण चोरुन नेले होते.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शैलेश कुदळे, दादासाहेब बर्डे यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेतला असता त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हा गुन्हा कल्पना कांबळे व तिच्या साथीदारांनी केला आहे. त्यावरुन पोलिसांनी पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून चोरलेले पैंजण व कार असा अडीच लाखांचा माल जप्त केला आहे.

You may have missed