Dinesh Gulab Chavan | नाथ जोगी–भराडी समाजातील डॉ. दिनेश गुलाब चव्हाण यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पीएचडी

Dinesh Gulab Chavan | Dr. Dinesh Gulab Chavan from Nath Jogi-Bharadi community gets PhD from Maharashtra University of Health Sciences

पुणे : Dinesh Gulab Chavan |  नाथ जोगी–भराडी समाजाचा पारंपरिक उदरनिर्वाह भिक्षेवर आधारित असताना, डॉ. दिनेश यांनीही हा व्यवसाय स्वतः केला होता . अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले आणि त्याच बळावर त्यांनी शिक्षणाचा मार्ग ठामपणे निवडला. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी आश्रम शाळेत पूर्ण केले व उच्च शिक्षण हे समाज कल्याणचे होस्टेल मध्ये राहून पूर्ण केले.  

नाथ जोगी–भराडी या भटक्या समाज परंपरेने अत्यंत मागासलेला व शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहिलेला आहे. अशा परिस्थितीतून पुढे येत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रात  नाथ जोगी–भराडी या भटक्या समाजातून पीएचडी पदवी प्राप्त करणारे डॉ. दिनेश गुलाब चव्हाण हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.  त्यांनी मुंबई येथील नामवंत सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय येथून डॉ. अमिता मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पदवी प्राप्त केली.

डॉ. दिनेश गुलाब चव्हाण हे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी व मागासलेल्या पट्ट्यातील करणवाडी (ता. पांढरकवडा) येथील मूळचे रहिवासी आहेत. सध्या ते ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या यशाबद्दल ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून विशेष पारितोषिक जाहीर केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुणशेकरण आणि डॉ. अक्षय खटावकर यांनीही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. डॉ. दिनेश गुलाब चव्हाण यांचे हे यश भटक्या व वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

You may have missed