Pune Police News | ड्रिंक अँड ड्राईव्ह : दोन पेक्षा अधिक वेळा कारवाई झाल्यास वाहन होणार जप्त – पोलीस आयुक्त अमितेशकुमार

Pune Police News | Drink and Drive: Vehicle will be seized if action is taken more than twice - Police Commissioner Amitesh Kumar

ड्रिंक अँड ड्राईव्ह करणार्‍या वाहन चालकांना पोलीस आयुक्तांकडून तंबी

पुणे : Pune Police News |  शहर पोलिसामार्फत शिवाजीनगर येथील मुख्यालयात, रस्ता सुरक्षा अभियान 2026, समुपदेशन आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ड्रिंक अँड ड्राईव्ह करणार्‍या वाहन चालकांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील,वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव हे देखील उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DUQJMcFCcXQ

यावेळी अमितेशकुमार म्हणाले,पुणे शहरात वाहतूक विभागामार्फत ड्रिंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट वाहन चालक यासह अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक विभागामार्फत जोरदार कारवाई करण्यात येत आहे.2023 मध्ये 550 जण, 2024 मध्ये 3000 हजार चालक तर 2025 मध्ये 6 हजाराहून अधिक वाहन चालक हे ड्रिंक अँड ड्राईव्ह करताना आढळून आले आहे.आमच्या पोलिस विभागामार्फत ड्रिंक अँड ड्राईव्ह करणार्‍या विरोधात जोरदार कारवाई सुरू असून आज त्यापैकी काही जण या ठिकाणी उपस्थित आहेत.आपण सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करून वाहन चालवावे,यापुढील काळात ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाईमध्ये आढळून आल्यास संबधित व्यक्तीचा फोटो वेबसाईटवर टाकण्यात येणार असून त्या व्यक्तिच्या ऑफिसला नोटीस पाठविण्यात येणार आहे.तसेच संबधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना बोलावून माहिती दिली जाणार आहे.

त्यामुळे येत्या काळात सर्वांनी काळजी घ्यावी,त्याच बरोबर पुणे शहरात ड्रिंक अँड ड्राईव्ह करताना एक ही नागरिक आढळता कामा नये, यासाठी आम्ही जे काही शक्य असेल ते करणार आहे.त्यामुळे येत्या काळात दोन पेक्षा जास्त ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाई झाल्याचे आढळून आल्यास संबधित चालकाचे वाहन जप्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ट्रिपल सीट वाहन चालकांची संख्या देखील वाढली असून त्यांचे वाहन देखील जप्त केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, पुणे शहर असो की अन्य कुठेही रस्ते अपघातांमध्ये दारू पिऊन वाहन चालवल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहे.हे आकडेवारीवरून समोर आले असून आपल्या पुणे शहरात

300 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवून मृत्यू होणार्‍या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले, आपल्या शहरातील कल्याणीनगर भागात 2024 मध्ये कार अपघातामध्ये दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला.त्या प्रकरणी अल्पवयीन कार चालक आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांना 19 महिने कारागृहात राहावे लागले आहे.एका बाजूला निष्पाप तरुणांचा बळी गेला.तर आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांना तुरुंगात जावे लागले आहे.त्यामुळे आपण एक नागरिक म्हणून आपल्या हातून कोणताही गुन्हा होता कामा नये, याबाबत विशेष काळजी घ्यावी आणि त्या दृष्टीने पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

You may have missed