Pune Crime News | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचारी भरती परीक्षेत गैरप्रकार, दुसऱ्याच्या नावावर परीक्षेला बसणार्‍या डमी उमेदवाराला पोलिसांनी केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) कनिष्ठ लेखापाल, तसेच सहायक पदासाठी आयोजित केलेल्या परीक्षेत गैरप्रकार करुन डमी परीक्षार्थी म्हणून बसणार्‍या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पर्यवेक्षिका राधिका कार्तिक यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमित कमलसिंग शर्मा Amit Kamalsingh Sharma (वय २५, रा. न्यांगल छोटी, ता. सिंधमुख, जि. चुरु, राजस्थान) या डमी उमेदवाराला अटक केली आहे. मुळ परीक्षार्थी धमेंदर संजीव कुमार (वय २२, रा. नौताना, महेंद्रगड, हरियाना) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना औंध येथील डी ए व्ही पब्लिक स्कुल येथे १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाने ज्युनिअर अकाऊंटंट व ज्युनिअर असिस्टंट या पदाकरीता परीक्षा आयोजित केली होती. यावेळी उमेदवारांना परिक्षा केंद्रात सोडताना त्यांची कागदपत्रे पाहुन सोडले जात होते़. अमित शर्मा याचे ओळखपत्र पाहिल्यावर पर्यवेक्षिकांना संशय आला. त्यांनी चौकशी केल्यावर तो बोगस परीक्षार्थी असल्याचे दिसून आले. त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अमित शर्मा याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

You may have missed