Pune PMC News | अतिक्रमण शोधण्याची जबाबदारी स्थानीक ‘कनिष्ट अभियंत्यावर’ ! अतिक्रमण कारवाई तीव्र करण्यासाठी महापालिका आयुक्तांची नवी ‘एसओपी’
पुणे : Pune PMC News | शहरात अतिक्रमण कारवाई अधिक कडक करण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पावले उचलली आहेत. यामध्ये अतिक्रमण शोधण्याची जबाबदारी सर्वस्वी स्थानीक कनिष्ठ अभियंत्यावर देण्यात आली असून त्याच्या माहितीवरून पुढील कारवाईमध्ये क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, झोनल उपायुक्त, बांधकाम आणि अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या जबाबदार्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अतिक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर त्यावर कारवाई केल्याचा विस्तृत अहवाल आयुक्त कार्यालयाकडे विहीत मुदतीत पाठविण्याचे आदेश नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
शहरातील बेकायदा बांधकाम, साईड व फ्रंट मार्जीनमधील बांधकाम, अनधिकृत फेरीवाले, पथारी व्यावसायीक अशा वरूपाच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी २० जानेवारीला वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये स्थानीक कनिष्ठ अभियंत्यावर अतिक्रमणे शोधून त्याची माहिती सहाय्यक क्षेत्रिय आयुक्तांना द्यायची, जबाबदारी सोपविली आहे. यापुढे संबधित व्यावसायीक अथवा अतिक्रमण धारकाला नोटीस पाठवून त्याची बाजू ऐकून घेण्याची जबाबदारी संबधित सहाय्यक आयुक्तांवरर सोपविली आहे. पुढील कारवाईसाठी उपायुक्तांच्या माध्यमातून बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभागासोबत कारवाईचा दिवस ठरविणे. बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभागाने मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त आणि वाहनांची उपलब्धता करण्यासाठी संबधित विभागासोबत समन्वय साधणे. कारवाईची तारिख निश्चित करून त्याचदिवशी कारवाई करणे अपेक्षित करण्यात आले आहे. कारवाईनंतरचा विस्तृत अहवाल विहीत मुदतीत महापालिका आयुक्तांकडे सादर करणे असे या आदेशानुसार बंधनकारक करण्यात आले आहे.
