Pune Crime News | मैत्रिणीला कॉल केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने सपासप वार ! थरकाप उडून देणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Pune Crime News | Young man stabbed by a coyote in anger over calling his girlfriend! Shocking incident captured on CCTV

पुणे : Pune Crime News |  पुणे शहरातील अनेक भागात मागील महिन्यापासून कोयता गँग ने धुमाकूळ घालून ठेवला आहे. कोणत्याचा धाक दाखवून दुकानात घुसून खंडणी मागणे,वाहनांची तोडफोड करणे.या घटना सुरू असताना,आता धनकवडी येथील त्रिमूर्ती चौकाजवळ मित्रासोबत एक तरुण गप्पा मारत असताना.त्या  तरुणावर एकाने कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. मैत्रिणीला कॉल केल्याच्या रागातून ही घटना घडल्याची माहितीसमोर आली आहे.

या घटनेमध्ये आदित्य सुनील कांबळे हा 21 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.चेतन बाजीराव चव्हाण वय 23 असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धनकवडी येथील समर्थ कॉम्प्लेक्स येथे आदित्य कांबळे हा मित्रा सोबत गप्पा मारत बसला होता.त्यावेळी चेतन चव्हाण याने आदित्य वर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.आदित्य ने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.पण त्याला खाली पाडून त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपी चेतन चव्हाण हा घटनास्थळावरून पसार झाला.या घटनेमध्ये जखमी झालेल्या आदित्य कांबळे या तरुणाला जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आरोपी चेतन चव्हाण याच्या मैत्रिणीला आदित्य कांबळे याने फोन केल्याने,ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातसमोर आल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले.

You may have missed