Pune Chakan Crime News | अनैतिक संबंध असलेला त्रास देत असल्याने मुलाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात दगड घालून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न, तब्बल 20 दिवसांनी चाकण उत्तर पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद

Pune Chakan Crime News | A boy with the help of a friend tried to destroy evidence by throwing a stone at a young man's head because he was harassing him for having an immoral relationship, Chakan North police arrested the accused after 20 days

पिंपरी/ पुणे : Pune Chakan Crime News | चाकण जवळील बिरदवडी गावाजवळ डोक्यात दगड घालून चेहरा छिन्न विछीन्न करुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चाकण उत्तर पोलिसांनी तब्बल २० दिवसांच्या प्रयत्नानंतर आरोपींना जेरबंद केले आहे.

निखिल नानासाहेब चव्हाण (वय २१, रा. खराबवाडी, ता. खेड, मुळ रा. कथनेश्वर, पो. धसाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) आणि स्वप्नील नरहरी पारधी (वय १९, रा. खराबवाडी, ता. खेड, मुळ रा. ढोकी, ता. जि. नांदेड) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. मुंजा धोंडिबा नरहिरे (वय २५, रा. गंगाखेड, जि़ परभणी) असे खुन झालेल्याचे नाव आहे.

चाकण जवळील बिरदवाडी गावाच्या स्मशानभूमीच्या मागील ओढ्याजवळ ११ जानेवारी २०२६ रोजी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याच्या चेहर्‍यावर दगडाने मारुन चेहरा छिन्न विछिन्न केला होता. त्याच्या खिशातील मोबाईल, ओळखपत्र, इतर वस्तू खुनी घेऊन गेले होते.

परिसरातील सीसीटीव्ही, कामगार अड्डे येथे मृतदेहाचे फोटो दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, काहीही माहिती पुढे आली नाही. खुन झालेल्या घटनास्थळावर मिळालेल्या भौतिक पुराव्यावरुन गुन्ह्यातील मोपेडबाबत माहिती मिळाली. त्यावरुन गाडी मालकाचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने त्याचा मित्र निखील चव्हाण याला ७ जानेवारीपासून मोपेड वापरण्यास दिल्याचे सांगितले. निखिल चव्हाण याचा शोध घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने सांगितले की, मुंजा चव्हाण याचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते.

मुंजा नरहिरे हा या महिलेला त्रास देत होता. त्यामुळे निखील चव्हाण याने स्वप्नील पारधी याला त्याबाबत सांगितले. तिघांनी मिळून कट रचला. मुंजा नरहिरे याला गंगाखेड येथून चाकण येथे ७ जानेवारी रोजी बोलावुन घेतले. त्याला मोटारसायकलवरुन बसवुन दारु पिण्याचे बहाण्याने बिरदवडी येथील स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत नेले. तेथे दारु पित असताना दोघांनी त्याच्यावर कोयत्याने डोक्यात, तोंडावर मारहाण करुन खुन केला. ओळख पटू नये, यासाठी डोक्यात दगड घालून चेहरा छिन्न विछिन्न केला. त्याचे जवळील सर्व चीज वस्तू काढून घेऊन गेले होते. मृतदेहाची ओळख पटविण्याकरीता कोणताही पुरावा नसताना चाकण उत्तर पोलिसांनी सलग २० दिवस अहोरात्र तपास करुन क्लिष्ट गुन्ह्यातील खुन झालेल्या तरुणाचा शोध घेऊन गुन्ह्यातील महिलेसह तिघांना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, सहायक पोलीस फौजदार सुनिल शिंदे, पोलीस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, योगेश कोळेकर, पोलीस अंमलदार शिवाजी लोखंडे, महेश कोळी, शरद खैरनार, सुमित जगझाप यांनी केली आहे.

You may have missed