Pune News | नऱ्हेतील ग्रीनलँड काउंटी सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; ज्येष्ठ महिलेवर पुन्हा जीवघेणा हल्ला

Pune News | Increasing threat of stray dogs in Greenland County Society in Narhe; Another fatal attack on an elderly woman

पुणे : Pune News |  नऱ्हे परिसरातील ग्रीनलँड काउंटी सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ महिलेवर दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, सोसायटी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही सोसायटी प्रशासन आणि पुणे महापालिकेकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.

या घटनेनंतर परिसरातील शेकडो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

You may have missed