Mumbai Pune Expressway Traffic | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 32 तासांनी पूर्ववत; ट्रक बंद पडल्याने काही ठिकाणी कोंडी

Mumbai-Pune Expressway | Mumbai-Pune Travel Set to Get Faster; Expressway to Be Expanded to 10 Lanes

पुणे :   Mumbai Pune Expressway Traffic | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 32 तासांच्या कोंडी नंतर मध्यरात्री 2 वाजता पूर्ववत झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या आर्थिक महत्त्वाच्या शहरांमध्ये जलद आणि सुरळीत वाहतुकीसाठी 1990च्या दशकात बांधण्यात आलेल्या या महामार्गावर अचानक झालेल्या अपघातामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला होता.

खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ प्रोपलीन गॅस वाहून नेणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला. या दुर्घटनेमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक तात्काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघातग्रस्त टँकरमधील ज्वलनशील गॅस सुरक्षित दुसऱ्या टँकरमध्ये ओतले गेले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या कडेला हलवण्यात आला आणि महामार्ग पुन्हा खुला करण्यात आला.

ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूकीत पुन्हा काही ठिकाणी अडथळा

गॅस टँकर हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असली, तरी मळवलीजवळ एका ट्रक बंद पडल्यामुळे आणि काही वाहन चालक झोपल्यामुळे कामशेत भागात पुन्हा वाहतुकीत कोंडी निर्माण झाली आहे. महामार्ग पोलिस झोपेत गेलेले वाहन चालक जागे करण्याचा प्रयत्न करत असून, वाहने पुढे सरकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूककोंडीची गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी चौकशी करुन सविस्तर अहवाल आणि शिफारसी सादर करण्याचे निर्देश त्यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कोंडीला त्वरित गांभीर्याने घेऊन आपत्कालीन वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, महामार्गावरच्या “मिसिंग लिंक” चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठीही त्यांनी सुचना दिल्या आहेत.

You may have missed