Sandeep Khardekar | अजित पवार अपघात प्रकरणी चौकशीची व्याप्ती वाढवण्याची मागणी; सोशल मीडियावरील दाव्यांचीही तपासणी करावी – संदीप खर्डेकर

Sandeep Khardekar | Demand to expand the scope of the investigation into Ajit Pawar accident case; Claims on social media should also be investigated - Sandeep Khardekar

पुणे : Sandeep Khardekar | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधन प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अपघाताचे नेमके कारण ब्लॅक बॉक्स तपासणीनंतर स्पष्ट होईल. तसेच राज्य सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश देणे ही पारदर्शक आणि संवेदनशील भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर विविध शंका, दावे आणि अप्रमाणित माहिती पसरवली जात असून त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

काही व्यक्ती आणि नेतेमंडळींकडूनही या प्रकरणाबाबत विविध पोस्ट आणि वक्तव्ये केली जात असल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे अशा सर्व दाव्यांची, पोस्टची आणि त्यामागील सूत्रधारांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. संबंधितांनी केलेले दावे सिद्ध न झाल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

You may have missed