Pune Crime News | खंडणीच्या गुन्ह्यातील 4 महिने फरार असलेला टोळीप्रमुख शेखर ठोंबरे जेरबंद
पुणे: Pune Crime News | खंडणी च्या गुन्ह्यात गेली ४ महिने फरार असलेला सराईत गुन्हेगार चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी वडगाव येथून अटक केली.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या परिसरात शेखर ठोंबरे याने आपली टोळी तयार करून दहशत पसरवत होता. चार महिन्यापूर्वी त्याच्या टोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, किरण साबळे यांना माहिती मिळाली की, शेखर ठोंबरे हा वडगाव येथील प्रयेजा सिटी येथे येणार आहे. पोलीस पथकाने सापळा रचून शेखर ठोंबरे याला पकडले.
सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांनी त्याला अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, अभिनय चौधरी यांनी केली आहे.
