Pune Crime News | जुन्नरमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी अकोला कारागृहात केले स्थानबद्ध

Pune Crime News | Action taken under MPDA against innkeeper in Junnar; Sent to Akola Jail for one year

पुणे : Pune Crime News | खुनाचा प्रयत्न, चोरी करणे, लैंगिक छळवणुक याच्यासह ६ गंभीर गुन्हे असलेल्या जुन्नरमधील सराईत गुन्हेगाराला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई करुन एक वर्षासाठी अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

अखलाख आसिफ शेख (वय ३२, रा. कागदीवाडा, जुन्नर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

जिल्हा परिषद निवडणुक काळात जिल्ह्यात शांततेत निवडणुका पार पाडाव्यात म्हणून गंभीर गुन्हे असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी दिले होते. अखलाख शेख याच्याविरुद्ध चोरी करणे, संगनमत करुन चोरी करणे, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे असे ६ गंभीर गुन्हे दाखल होते. जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांना एमपीडीए कायद्यांतर्गत कार्यवाहीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यांनी तो प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला. अखलाख शेख याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल, अशा प्रकारची कृत्य करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन अकोला कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला. जुन्नर पोलिसांनी या आदेशानुसार अखलाख शेख याला ताब्यात घेऊन त्याची अकोला कारागृहात रवागनी केली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेशा चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, उपनिरीक्षक ऋषिकेश तिटमे, सहायक पोलीस फौजदार महेश बनकर, पोलीस हवालदार गणेश धनवे, पोलीस अंमलदार प्रसन्नजीत घाडगे, श्रीराम शिंदे, विशाल चौधरी यांनी केली आहे.एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. वक्तशीरपणा हीच एसटीची ओळख ठरली पाहिजे, यादृष्टिने एसटी प्रशासनाने सज्ज होण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी, हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

You may have missed