Pune Crime News |  पूर्ववैमनस्यातून तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार करून केले जखमी, कारच्या काचा फोडून पसरवली दहशत (Video)

Pune Crime News | Out of old enmity, a gang attacked a young man with a sickle and injured him, spread terror by breaking the car window (Video)

पुणे : Pune Crime News |  पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्या कारच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DUayuDbCX-N

याबाबत सौरभ बाळकृष्ण सातव ( वय २३, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अमन झारेकरी व त्याच्या ५ ते ६ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगाव बुद्रुक येथील महालक्ष्मी मंदिराच्या जवळ ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे मित्र जितेश गायकवाड, सुजित पवार, बनसोडे यांच्या बरोबर नितेशच्या कार शेजारी गप्पा मारत थांबले होते. सौरभ सातव यांचे २ महिन्यापूर्वी अमन झारेकरी यांच्याबरोबर वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून अमन झारेकरी व त्याचे ५ ते ६ साथीदार तेथे आले. अमन याने सौरभच्या हातावर दुसऱ्या मुलाने पोटावर वार केले. इतरांनी जितेशच्या हातावर, दंडावर, मानेवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. जितेशच्या कारच्या सर्व काचा फोडल्या. हातातील लोखंडी हत्यारे हवेत फिरवून आमच्या नादी लागायचे नाही, असे म्हणत दहशत माजवून निघून गेले. सौरभ सातव यांच्यावर नवले हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

You may have missed