Pune Crime News | जागेच्या सरंक्षणासाठी लावलेले पत्रे वाकवुन तेथे मूर्ती ठेवून जागा हडप करण्याचा प्रयत्न करुन अ‍ॅस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार्‍यावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  वडगाव शेरी येथील जागेच्या सरंक्षणासाठी पत्रे लावले असताना ते वाकवुन आतमध्ये गौतम बुद्ध यांची मूर्ती ठेवून जागा बळकविण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणाला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. चंदननगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

राकेश हणमंत टोटे Rakesh Hanmant Tote (वय ५५, रा. दिगंबरनगर, वडगावशेरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत राजू अंबादास वाघमोडे (वय ३०, रा. डोमखेल, वाघोली) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी मोकळ्या जागेत १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू वाघमोडे दत्तात्रय कुलकर्णी यांच्याकडून वडगाव शेरी येथील मोकळा प्लॉट २२ मे २०२६ रोजी विकत घेतला. त्याचे खरेदी खत झाल्यावर ६ जुलै रोजी ते जागेवर गेले. त्यांनी प्लॉटची पाहणी करून त्या प्लॉटच्या हद्दीवर पत्रे लावले. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी सकाळी त्या जागेवर गेले असता त्यांनी जागेभोवती लावले पत्रे वाकवुन नुकसान केल्याचे दिसले. त्यांनी आजू बाजूला चौकशी केल्यावर १५ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता राकेश  टोटे  हा या प्लॉटमध्ये बेकायदेशीरपणे शिरला. त्यांनी लावलेले पत्रे वाकवून त्यांचे नुकसान केले. त्यांची जागा हडप करण्यासाठी त्यांच्या जागेत गौतम बुद्ध यांची मूर्ती ठेवून त्यांच्यावर अ‍ॅस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे तपास करीत आहेत.

You may have missed