Pune Crime News | कारच्या काचा फोडून दोघांवर वार करुन दहशत पसरविणार्या गुंडांची सिंहगड रोड पोलिसांनी काढली वरात
पुणे : Pune Crime News | दोघांवर वार करुन कारच्या काचा फोडत दहशत पसरविणार्या चार गुंडांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक करुन त्यांची वडगाव परिसरात वरात काढली.
अमन अंबीर झारेकरी Aman Ambir Jharekari (वय २२, रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पुल, सिंहगड रोड), निशांत राजेश राऊत Nishant Rajesh Raut (वय २४, रा. महाडिक चाळ, अप्पर ओटा, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सुमित अनिल माने Sumit Anil Mane (वय २२, रा. जिजामाता वसाहत, हडपसर), स्वप्निल चंद्रकांत गायकवाड Swapnil Chandrakant Gaikwad (वय २०, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्हा करताना वापरलेली दुचाकी व ३ लोखंडी हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
वडगाव येथील महालक्ष्मी मंदिरासमोर ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पाच ते सहा गुंडांनी येऊन पांढर्या रंगाच्या सुझुकी फ्रॉक्स कारच्या काचा फोडल्या. तसेच कारमधील दोघांवर लोखंडी हत्याराने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले होते.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनेच्या ठिकाणाचे व आरोपीच्या येण्या जाण्याचे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन आरोपी निष्पन्न करुन त्यातील चौघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके अधिक तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, भुपेश साळुंखे, पोलीस हवालदार अण्णा केकाण, उत्तम तारु, विकास बांदल, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, सतीश मोरे, समीर माळवदकर, ज्ञानेश्वर डाके यांनी केली आहे.
