Pune ACB Trap Case | खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात 1 लाख 30 हजाराची लाच घेतली असताना 20 हजार घेताना PSI ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
पुणे : Pune ACB Trap Case | लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अगोदर १ लाख ३० हजाराची लाच घेतली असताना आणखीन २० हजार रुपये घेताना पी एस आय ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे.
नाथा रामकिसन केकाण Natha Ramkisan Kekan (वय ३८, रा. साई विजन सोसायटी, रावेत) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. नाथा केकाण हे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहेत.
तक्रारदार यांच्या भावावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलीस उप निरीक्षक नाथा केकाण यांनी या गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी व जामिनास अगोदर १ लाख ३९ हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांच्या भावावरील चापटर केस मध्य मदत करण्यासाठी व चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे १६ नोव्हेंबर रोजी मिळाली. त्या पडताळणीत नाथा केकाण याने यापूर्वी लाच स्वीकारल्याचे मान्य केले. तडजोडी अंती २०हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानंतर लोणावळा येथील फूड कोर्ट येथे सापळा लावण्यात आला. नाथा केकाण त्याला तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेताना पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस हवालदार वनिता गोरे, दगडू सोनावणे, पोलीस अमलदार रवी दिवेकर यांनी केली आहे.
