Pune Traffic Police Action | वाहतूक नियमभंग करणार्‍या वाहनचालकांकडून 4 दिवसात तब्बल 1 कोटींची दंडवसुली; 5 हजार ट्रिपल सीट वाहनधारकावर कारवाई, आजवरची सर्वाधिक दंडवसुली

Pune Traffic Police Action | Traffic fines totaling 1 crore collected from drivers violating traffic rules in 4 days; action taken against 5,000 triple-seat vehicle owners, the highest fine collection so far

पुणे : Pune Traffic Police Action | वाहतूक पोलीस व ४४ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी सुरु केलेल्या विशेष मोहिमेत ट्रिपल सीट व इतर वाहतूक नियमभंगाच्या गुन्ह्यात ४ दिवसात पोलिसांनी पुणेकरांकडून तब्बल १ कोटी ३ लाख २५ हजार १५० रुपयांची दंड वसुली केली आहे. इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कारवाई करण्यात येऊन दंड वसुली करण्याचा एक विक्रम पुणे पोलिसांनी केला आहे.

वाहतूक पोलीस शाखेचे ३० विभाग आणि ४४ पोलीस ठाणी यांनी गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम सुरु केली आहे. यामध्ये १२ व १३ फेब्रुवारी रोजी शहरांमध्ये ट्रिपल सीट वाहन चालविणार्‍या २ हजार ६४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ९८८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. २ हजार १३७ चलन पेड करुन घेण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येक १ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. त्यामधून २१ लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय एकूण १३ हजार ३०८ चलनांवर कारवाई करण्यात आली आहे.

१० फेब्रुवारीपासून आतापर्यंत एकूण ५ हजार ३८० ट्रिपल सीट वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. ट्रिपल सीट व इतर नियम भंग करणार्‍या वाहनचालकांकडून १ कोटी ३ लाख २५ हजार १५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

You may have missed