Pune Crime News | दारु पिल्यानंतर शिवीगाळ केल्याने मित्राचा केला खुन; लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  दारु पिल्यानंतर आई बहिणीवरुन शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राने मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारुन त्याचा खुन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना येरवडा येथील कामराजनगर येथील खड्डा मस्जिद परिसरात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजता घडली.

माशक गाजीबक्ष विजपुरे (वय ४०, रा. गजराज चौक, येरवडा) असे खुन झालेल्याचे नाव आहे. लक्ष्मीनगर पोलिसांनी घटनेनंतर दीड तासात गणेश वसंत शिंदे (वय ३४) याला  अटक केली आहे. माशक विजपुरे हा केटरिंगचा व्यवसाय करत होता. तर, गणेश शिंदे हा पेंटरचे काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माशक विजपुरे आणि गणेश शिंदे हे दोघे एकमेकांचे मित्र होते. दारु पिल्यानंतर ते दोघे कामराजनगर खड्डा मस्जिद परिसरात बसले होते. त्यावेळी माशक विजपुरे याने गणेश याला आई बहिणीवरुन शिवीगाळ केले. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी गणेश याने माशक याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत माशक जागीच कोसळला. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माशक याला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच माशक याचा मृत्यु झाला.

पोलिसांनी गणेश शिंदे याला अटक केली असून लक्ष्मीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed