Pune Crime News | उद्योजकाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी धमकी देणार्‍या पतीपत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक, वकिलासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  व्याजाने घेतलेले पैसे परत केले असतानाही त्रास देण्याच्या उद्देशाने महिलेवर अत्याचार करुन पत्नीच्या मदतीने तिचे अश्लिल व्हिडिओ तयार करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघा पतीपत्नीला अटक केली आहे.

प्रताप रमेश जाधव (वय ४५) आणि त्याचे पत्नी पल्लवी दादासो कारंडे/ पल्लवी प्रताप जाधव (वय २८, दोघे रा. भिंताडेनगर, सिंहगड कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी या पतीपत्नी व एका वकिलासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुन २०२४ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पल्लवी जाधव या मैत्रिणी आहेत. फिर्यादी यांनी प्रताप जाधव याच्याकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यांनी ते पैसे परत केले होते. असे असताना त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने पल्लवी जाधव ही त्यांच्या घरात नसताना प्रताप जाधव याने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केले. त्याची तक्रार देण्यासाठी त्या पोलिसांकडे जात असताना प्रताप व पल्लवी यांनी पुन्हा फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना पूर्ण पैसे दिले आहेत, आता आणखी देऊ शकत नाही, असे म्हणाली. 

तेव्हा पल्लवी हिने प्रताप याला ‘‘प्रताप हिची मस्ती जिरव’’ असे म्हणाली. तेव्हा पल्लवी घरात असताना प्रताप याने फिर्यादी हिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ व फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रताप, पल्लवी व इतरांनी उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. गुन्हा दाखल केल्यास फिर्यादीला २० ते २५ लाख रुपये व एक फ्लॅट नावार करुन देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांनी तसे करण्यास नकार दिल्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघा पतीपत्नीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत.

You may have missed