Pune Crime News | पॅलेस्टाईन नागरिकांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या 23 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जंगली महाराज रोडवर केली निदर्शने

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | जंगली महाराज रोडवर छत्रपती संभाजी उद्यानामध्ये महापालिकेने पुष्प प्रदर्शन आयोजित केले होते. त्यामुळे तेथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही काही कार्यकर्त्यांनी पॅलेस्टाईन नागरिकांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. अशा २३ जणांवर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस हवालदार नलीन सुधाकर येरुणकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्वप्नजा मनोज लिमकर, अश्विनी सुनिल खैरनार (वय ३२), भुमिकाडी पांढरे (वय ३५), ललिता तंगीराला, योगिराज हनुमंत पाटील (वय २७), आकाश अगरवाल (वय २७), वेदांत रतन सिंग राठोड), सुप्रित रविष (वय २८), प्रविण पंढरीनाथ एकडे (वय २८), लावण्या संजयकुमार आंनद (वय २९), सारा मजीद सोदागर (वय २५, रा. महर्षीनगर), प्रतिक्षा सदाशिव राहिंज (वय २१, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), गुंजन विशालसिंह परिहार (वय २३, रा. संध्यानिल, महर्षीनगर),

टिना अजय पवार (वय २३, रा. शाहु कॉलनी, कर्वेनगर), नेहा राहुल जाधव (वय २०, रा. शंकर सोसायटी, गुलटेकडी), पृथा आनंद वाघ (वय २५, रा. मायामी अपार्टमेंट, वडगाव), पवन प्रताप इन्सान (वय ३९, रा. बेल्हेकर वस्ती, मांजरी), अरुण आण्णासाहेब कुकडे (वय २८, रा. जनता वसाहत), सना उल्लाह अन्सारी (वय २९, रा. एटीनगर, टिटवाला, कल्याण), जयवर्धन यशवंत जुमडे (वय ३२, रा. जवळगाव, ता. जि. वर्धा), मिराज मिलींद जाधव (वय २९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), रजत मिमांशी (वय २८, रा. धारवाड, कर्नाटक), साहिल कुलदिप नैन (वय २४, रा. जनता वसाहत) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच इस्त्राईलला भेट देणार आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी उद्यानात पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शन पाहण्यासाटी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली, तशी लेखी नोटीस डेक्कन पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दिली होती, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी दिली.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही विना परवाना आंदोलन करत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव तपास करीत आहेत.

You may have missed