Nafisa Begum Sattar Passes Away | आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर : Nafisa Begum Sattar Passes Away | सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी, तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम अब्दुल सत्तार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सत्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण सिल्लोड शहरात शोककळा पसरली आहे.
नफिसाबेगम सत्तार यांनी केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्याच पार पाडल्या नाहीत, तर सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात स्थानिक समस्या सोडविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रत्येक राजकीय संघर्षात आणि चढ-उतारात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सत्तार यांच्या यशात नफिसाबेगम यांचा मोठा वाटा आहे.
दरम्यान, नफीसाबेगम यांच्या निधनामुळे सिल्लोडमधील जनतेने आपला एक आधारवड गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
