Pune Police Recruitment 2026 | पुणे शहर पोलीस दलातील पोलीस भरतीला सुरुवात; 1633 पदांसाठी 1.85 लाख अर्ज

Pune Police Recruitment 2026 | Police recruitment in Pune City Police Force begins; 1.85 lakh applications for 1633 posts

पुणे : Pune Police Recruitment 2026 | शहर पोलीस दलातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. एकूण १६३३ जागांसाठी तब्बल १ लाख ८५ हजार उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी दिली. त्यामुळे मैदानात हजारो उमेदवार उतरले असले तरी निवड मोजक्यांचीच होणार आहे.

https://www.instagram.com/p/DU26qeLCSuq

या भरतीत पोलीस अंमलदार, १०५ वाहनचालक, ३३ पोलीस बँड कर्मचारी अशा पदांचा समावेश आहे. तसेच कारागृह पोलीसांच्या १३० पदांसाठीही स्वतंत्र भरती होणार आहे. प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही देखरेखीचा वापर केला जात आहे.

मैदानी चाचण्या पुणे शहर पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ च्या मैदानावर होत आहेत. शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. उंची मोजणी, १०० मीटर धाव, १६०० मीटर धाव (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक हे घटक चाचणीत समाविष्ट आहेत. शारीरिक चाचणीसाठी १०० गुण असून किमान ५० गुण मिळवणे आवश्यक आहे.

You may have missed