Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला फुरसुंगी पोलिसांनी वाई मधून केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी लगट करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन फरार झालेल्या नराधमाला फुरसुंगी पोलिसांनी एक महिन्याभराच्या शोधानंतर वाई मधून जेरबंध करण्यात यश आले आहे.
विठ्ठल विजय पोळ Vitthal Vijay Pol (वय ३०, रा. भोसले व्हिलेज, भेकराईनगर, फुरसुंगी) असे या नराधमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पोळ याने अल्पवयीन मुलीशी लगट करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिचे फोटो व्हायरल करील अशी धमकी दिली होती. त्यामुळे या अल्पवयीन मुलीने ८ जानेवारी २०२६ रोजी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तोपर्यंत तो फरार झाला होता.
पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन तो आपले अस्तित्व लपवून वावरत असल्याचे दिसून आले. तो सतत आपले वास्तवाचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना तो सापडत नव्हता. जवळपास एक महिन्याहून अधिक काळ त्याचा शोध घेत असताना पोलिसांनी माहिती मिळाली की, तो वाई तालुक्यातील धोम येथे येणार आहे. तातडीने पोलीस पथक धोम येथे पोहचले व त्यांनी विठ्ठल पोळ याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो रत्नागिरी, कोकणात विविध ठिकाणी फिरत असल्याचे सांगत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिांदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलीस हवालदार सागर वणवे, पोलीस अंमलदार हेमंत कामथे यांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे अधिक तपास करीत आहेत.
